छत्तीसगड : नारायण जिल्ह्यात नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या जिल्ह्यातील अबुझमाड जंगलात मंगळवारी सकाळी भारतीय जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या दोन्ही बाजूने सुरु झालेल्या चकमकीत एसटीएफच्या पथकाला मोठं यश मिळालं.
दरम्यान या गोळीबारात ४ नक्षलवादी मारले गेले आहेत.जंगलातील लपलेल्या अनेक नक्षलवाद्यांना घेरण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. या भागात नक्षली आणि एसटीएफ जवानांमध्ये चकमक सुरु आहे.
सोमवारी सुकमाच्या सलातोंग भागाजवळ भारतीय जवान आणि नक्षलींमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु होती. या चकमकीत भारताच्या जवानांनी एका नक्षलवाद्याचा खात्मा केला होता. नक्षलवाद्याचा खात्मा केल्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी प्रतिक्रिया दिली. 'सरकार मोठ्या ताकदीने नक्षलवाद्यांच्या विरोधात लढत आहोत. नक्षलवाद्यांकडे दुसरा मार्ग देखील खुला आहे. आत्मसमर्पण करण्याचा मार्ग नक्षलवाद्यांकडे आहे.