आज वसुबारस... दिवाळी सणाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली असे म्हणतात. महाराष्ट्रात दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस या सणाने साजरा केला जातो. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी ही रमा एकादशी किंवा वसुबारस या नावाने ओळखली जाते. या दिवशी गाईसह तिच्या वासराची पूजा केली जाते.
वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी. दिवाळी सण यंदा 28 ऑक्टोबर म्हणजेच आजपासून सुरू झाला आहे. याच वसुबारसनिमित्त तुमच्या प्रियजनांना येथे दिलेल्या खास शुभेच्छा संदेश पाठवा.
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा..!
आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
आज वसुबारस..
दिवाळीचा पहिला दिवस..
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना,
सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा..!
सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!
या मंगलदिनी घरोघरी यश-समृद्धी, सुख नांदावे
हीच देवाकडे प्रार्थना...
गाय आणि वासराच्या अंगी असणारी
वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी
हे सर्व आपणास लाभो....
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा...
गायी आणि वासरांची
सेवा आणि संरक्षण करा
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची
दिवाळीचा पहिला दिवस
वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा...
जिच्या सेवेने सर्व संकट दूर होतात
अशा गाय मातेमध्ये आहे सर्व देवांचा अंश
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा..!
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा
शेतकऱ्याचे शेती आणि मातीशी
असणारे सेंद्रिय नाते सुदृढ
करणारा वसुबारस हा सण.
या सणानिमित्ताने शुभेच्छा
वसुबारस या शब्दातील वसू
म्हणजे धन त्यासाठी
असलेली बारस म्हणजे द्वादशी
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा
गोमातेला सांगू आपली गाऱ्हाणी,
दूधदुभत्याची सदा व्हावी वृद्धी,
व्हावी कृपा, नांदावी रिद्धी-सिद्धी,
गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी!
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारसनिमित्त
आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा…!
दारी सजले तुळशी वृंदावन,
त्यासवे होई कामधेनूचे पूजन,
गोमातेच्या उपकारांचे करुणा स्मरण,
साजरा करूया वसुबारस हा सण..
राज्यात पुन्हा एकदाचे बळीराजा तुझे यावे
ईडा पिडा ही टळावी दुःख-दारिद्र्य जळावे
सुख-समाधानाची आनंदी क्षणांची
दिवाळी तुमची-आमची खूप साऱ्या शुभेच्छांची
दिवाळीचा पहिला दिवस अर्थात वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा…!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. दैनिक भ्रमर यातून कोणताही दावा करत नाही. )