मोठी बातमी : फर्निचर बनवणाऱ्या कारखान्याला  भीषण आग! अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
मोठी बातमी : फर्निचर बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग! अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
img
Dipali Ghadwaje
मागील काही दिवसांपासून मुंबईसह, नवी मुंबई शहर परिसरात आगीच्या घटना वाढल्या आहेत. अशातच आता नवी मुंबईच्या तुर्भे एमआयडीसी परिसरात असलेल्या एका फर्निचर बनवणाऱ्या कारखान्याला मंगळवारी (ता.२७) दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचं कळताच कारखान्यातील कामगारांनी बाहेर धाव घेतली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. त्यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला.  

मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाचे ४ बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. कारखान्यात लाकडी सामान असल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. 


नेमकं काय घडले?
नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील एमआयडीसीमध्ये एक फर्निचर बनवणारा कारखाना आहे. या कारखान्यात लाकडी वस्तू तयार करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास काही कामगार काम करत असताना कारखान्यातील एका भागाला अचानक आग लागली. कामगारांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारखान्यात लाकडी वस्तू असल्याने आगीचा भडका उडाला. त्यामुळे कामगारांनी आपला जीव वाचवण्यासाठी कारखान्याबाहेर धाव घेतली. क्षणार्धात आगीने संपूर्ण कारखान्याला विळखा घातला होता. आगीचे लोट दूरपर्यंत दिसून येत होते.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group