मुंबईतील BKC परिसरातील सरकारी कार्यालयाला भीषण आग
मुंबईतील BKC परिसरातील सरकारी कार्यालयाला भीषण आग
img
DB
मुंबई : मुंबईमधुन एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील बीकेसी परिसरातील सरकारी कार्यालयाला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. निवृत्ती वेतन विभागाच्या या कार्यालयाच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याला आग लागल्याची घटना घडलीय. 

मिळालेल्या माहितीनुसार , कार्यालयातील अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतरही आग शमली नसल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. कार्यालयाला आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाहीये. अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे.
mumbai | fire |
इतर बातम्या
Join Whatsapp Group