मुंबईमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतल्या ओशिवरा परिसरातील इमारतीला मोठी आग लागली. रिया पॅलेस या इमारतीला दहाव्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीमध्ये तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशनम दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ,चंद्रप्रकाश सोनी (७४ वर्षे), ममता सोनी (७४ वर्षे ) आणि त्यांचा नोकर पेलू बेटा ( ४२ वर्षे) यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला आहे. या इमारतीमध्ये आणखी काही जण अडकल्याची माहिती मिळत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमध्ये परिसरामध्ये धुराचे लोट परसरले आहेत. ओशिवरा पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास सुरू आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहेत.