सारडा सर्कलवर बर्निंग कारचा थरार
सारडा सर्कलवर बर्निंग कारचा थरार
img
DB

नाशिक (प्रतिनिधी) :- शहरातील सारडा सर्कल परिसरात आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास एका मारुती ओमनी व्हॅनने पेट घेतला. यामुळे परिसरात वाहनचालकांमध्ये धावपळ उडाली, तर बघ्यांची गर्दीदेखील मोठ्या प्रमाणात जमा झाली.

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मारुती ओमनी व्हॅन क्रमांक एमएच 18 डब्ल्यू 3718 ही व्हॅन पेटल्याचे समजताच महानगरपालिकेच्या मल्टीपर्पज वॉटर टेंडर फायर फायटरसह कर्मचार्‍यांनी धाव घेतली व दोन्ही बाजूंनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली.

आगीचे कारण समजू शकले नाही. आग विझविण्यासाठी कर्मचारी के. टी. पाटील, इसाक शेख, एस. एल. पाटील, तसेच वाहनचालक जयंत सांत्रस यांच्या पथकाने परिश्रम घेतले.


fire |
इतर बातम्या
Join Whatsapp Group