धारावीमध्ये गोदामाला आग लागल्याची घटना रात्री तीनच्या सुमारास घडली आहे.या घटनेत सहाजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निशनम दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. युद्ध पातळीवर आग विझवण्याचे काम सुरु होते. ही आग नेमकं कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार , मुंबईच्या धारावीमध्ये पहाटेच्या वेळी आग लागल्याचं समोर आलं होतं. धारावीतील एका गोदामाला ही आग लागली होती. यावेळी या आगीत 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळण्यात आल्याचं समजतंय.
मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या आगीत जखमी झालेल्या रूग्णांवर सायन रूग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग जमिनीपासून ते तीन मजल्यापर्यंत लागली. ही आग लागल्यानंतर जवळच्या लाकडांमुळे ती अधिक पसरली आहे. दरम्यान यापैकी एका रूग्णाला डिस्चार्ज दिला असल्याची माहिती आहे.