नाशिकरोड (प्रतिनिधी): जेलरोड येथील एका कपड्याच्या दुकानाला अचानक आग लागल्याने दुकानातील सर्व कपडे अगीच्या विळख्यात सापडले.
जेलरोड दसक येथील आढाव पेट्रोल पंप लगत शाम वाघ यांच्या जागेत भाड्याने अस्थायी पत्राचे शेड उभारून रेडिमेड कपड्याचे दुकान थाटाले होते.
दरम्यान येणाऱ्या दसरा, दिवाळी च्या पार्शवभूमीवर या शेड मध्ये नव्याने आलेला मोठा माल होता. दुकान चालक यांनी काल दुकान बंद करुन घरी गेले असता रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शेड मधून धूर व काही वेळा नंतर अगीचे लोट दिसू लागले.
बाजूला रस्त्यावरील पदचारी व वाहन धारकांनी अग्निशमक मुख्यालय येथे कळवले असता नाशिकरोड चे दोन व पंचवटी येथील एक बंब अश्या तीन बंबच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पर्यंत पत्राचे शेड व त्या मधील कपडे जळून खाक झाले. नाशिकरोड पोलिसात याबाबत नोंद करण्यात आली.