मोठी दुर्घटना: व्हिएतनाममध्ये नऊ मजली इमारतीला भीषण आग, अनेक जणांचा होरपळून मृत्यू
मोठी दुर्घटना: व्हिएतनाममध्ये नऊ मजली इमारतीला भीषण आग, अनेक जणांचा होरपळून मृत्यू
img
Dipali Ghadwaje
हनोई : व्हिएतनामची राजधानी हनोई येथील नऊ मजली इमारतीला भीषण आग लागली.  व्हिएतनाममधील अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये लागलेल्या या भीषण आगीत अनेक नागरिकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये मंगळवारी रात्री ही आग लागल्याचं समजतं. आगीचं नेमकं कारण बुधवारी (13 सप्टेंबर) सकाळपर्यंत समजू शकलेलं नाही. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, व्हिएतनामची राजधानी हनोई येथील नऊ मजली इमारतीला बुधवारी आग लागल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री साडे अकराच्या सुमारास ही आग लागली, त्यावेळी इमारतीमधील रहिवासी घरात झोपलेले असताना आग लागली. 

दरम्यान अधिकाऱ्यांनी अद्याप मृतांच्या आकड्याची पुष्टी केलेली नाही. अधिकृत व्हिएतनाम न्यूज एजन्सीने सांगितले की, १५० रहिवासी असलेल्या इमारतीला मध्यरात्री आग लागली. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार पहाटे दोन वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली.

इमारतीला लागलेल्या भीषण आगीमुळे जवळपास दहाहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असले तरी अद्याप बचावकार्य सुरू आहे. तसेच, घटनास्थळी अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल आहे.

याचबरोबर, बुधवारी पहाटे ५ वाजेपर्यंत इमारतीमधून ७० जणांची सुखरूप सुटका करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी ५४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहेत. अद्याप मृतांच्या आकड्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group