आगीचे सत्र सुरूच : सातपूरच्या  स्वारबाबानगरमध्ये भंगार दुकानासह घराला आग
आगीचे सत्र सुरूच : सातपूरच्या स्वारबाबानगरमध्ये भंगार दुकानासह घराला आग
img
DB
सातपूर प्रतिनिधी : नाशिकच्या सातपूर परिसरात आज दुपारच्या सुमारास आगीची मोठी घटना घडली आहे. सातपूरमधील स्वारबाबानगर परिसरात ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या आगीत भंगार दुकानासह घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यात संबंधिताचे जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले आहे. आज दुपारी  दोन वाजण्याच्या सुमारास अचानक भंगार दुकानास आग लागली. आग पहाताच जवळ असलेल्या नागरिकांनी घर व दुकान मालक वाहब शेख यांच्याकडे धाव घेत घरातील मुलाबाळांना बाहेर काढले. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. 

दरम्यान घटनास्थळी अग्नीशामक दोन बंब दाखल झाले होते, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group