२१ मजली इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाचे ८ बंब घटनास्थळी दाखल
२१ मजली इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाचे ८ बंब घटनास्थळी दाखल
img
Dipali Ghadwaje
मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात असलेल्या धवल गिरी इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. इमारतीच्या ११ आणि १२ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनेची महिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि ६ जंबो टँकरसह स्थानिक पोलीस दाखल झालेत. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग भीषण असल्याने 'लेव्हल २' घोषित करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आगीच्या घटना वाढल्या आहेत. आज सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी ग्रँट रोड येथील ऑगस्ट क्रांती रोड येथील धवलगिरी या इमारतीला भीषण आग लागली. आगीचे धुराचे लोट दूरवरूनही दिसत होते.

२१ आणि २२ व्या मजल्यावर काही नागरिक अडकले होते. त्यांना टेरेसवर सुरक्षितपणे हलवण्यात यश आलं आहे. तर, १५ व्या मजल्यावरही ७ ते ८ नागरिक अडकले होते. त्यांनाही पायऱ्यांमार्फत टेरेसवर हलवण्यात आलं आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group