विशाखापट्टणम बंदरात अग्नितांडव; 40 बोटी जळून खाक.....
विशाखापट्टणम बंदरात अग्नितांडव; 40 बोटी जळून खाक.....
img
Dipali Ghadwaje
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे भीषण आगीची घटना घडली आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील बंदरात रविवारी रात्री भीषण आग लागलीय. या आगीत तब्बल 40 बोटी जळून खाक झाल्या आहेत. मासेमारीसाठी या बोटी ठेवण्यात आल्या होत्या.अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांच्या मदतीनं तासाभराच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मासेमारी बंदरात एका बोटीत अचानक भीषण आग लागली आहे. एका बोटीला लागलेली आग पुढे वाढत गेल्याने या घटनेत 40 बोटी जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये बोटींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. 

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. विशाखापट्टणम येथील बंदरात उभ्या असलेल्या एका बोटीला काल रात्री अचानक आग लागली. ही आग वेगानं पसरली आणि शेजारी उभी असलेली दुसरी बोट त्यात अडकली. याठिकाणी सुमारे 40 बोटी उभ्या होत्या. या बोटींसह समुद्रात मासेमारीसाठी जाण्याची तयारी सुरू होती. ही आग इतकी वेगानं पसरली की एकामागून एक अनेक बोटी त्यात अडकल्या. अशा प्रकारे आगीत 40 बोटी जळून खाक झाल्या आहेत.

 स्थानिकांनी अग्निशमन दलाला सूचना दिल्याने आग विझवण्यासाठी त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अज्ञात व्यक्तींनी जाणूनबुजून बोटींना आग लावली असावी असा संशय स्थानिक मच्छिमारांनी व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री मच्छीमारी करून अनेक बोटी किनाऱ्यावर परतलेल्या होत्या. यावेळी अचानक एका बोटीत स्फोट झाल्यासारखा आवाज आला. अचानक झालेल्या स्फोटामुळे मच्छीमारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. एका बोटीला लागलेली आग पुढे अनेक बोटींना लागली. आगीत तब्बल 40 बोटी जळून खाक झाल्या.
 
आग नेमकी कशी लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. काही मच्छीमारांनी या बोटीला आग लावली असावी असाही संशय अन्य मच्छीमारांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून अधिक तपास सुरू आहे.तसेच, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group