मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कारला अपघात
मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कारला अपघात
img
DB
बीड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलणाऱ्या बीडमधील गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कारला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. कारचा टायर फुटल्याने अपघात झाला. अपघातानंतर विठ्ठल महाराज शास्त्री यांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कारला अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये हा अपघात झाला. विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कारचा टायर फुटताच त्यांची गाडी खड्ड्यामध्ये जाऊन आदळली. या अपघातात विठ्ठल महाराज यांना किरकोळ दुखापत झाली आहे. विठ्ठल महाराजांवर साईदीप हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार सुरू आहेत. सध्या विठ्ठल महाराजांची प्रकृती स्थिर आहे. तसेच ते सुखरुप असल्याचं सांगण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group