राज्यात चाललंय काय ? अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी
राज्यात चाललंय काय ? अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी
img
वैष्णवी सांगळे
राज्यात चाललंय काय असा प्रश्न आता विचारण्याची वेळ आता आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट आखल्याचं प्रकरण ताजं असतानाच, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 



अंजली दमानिया या अमेरिकेत असताना त्यांना  वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती मिळाली. त्या म्हणाल्या की, एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला होता. माझा गेम करायचा आहे, असे इनपूट्स त्यांना मिळाले होते. यांचं अति होत चाललं आहे. यांना धडा शिकवायचा आहे. यांचा गेम करायचा आहे, अशी त्यांची भाषा होती. ही माहिती मला अधिकाऱ्यांकडून देण्यात आली असून, सावध राहण्यास सांगितले. 

याबाबत मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. त्यांनी मला सुरक्षा व्यवस्था घेण्यास सांगितले. पण मला सुरक्षा व्यवस्था नको. मी सुरक्षा घेणार नाही, असं अंजली दमानिया म्हणाल्या. धमकी देणारे लोक आहेत ते सेकंड रँकचे आहेत, काळजी घ्यावी. तुम्ही गाड्या बदलून बदलून वापरा. तसेच वाहनामध्ये असताना तुम्ही फोन बंद करा, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group