अजित पवारांच्या जागी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची चिन्हं, मोठी जबाबदारी मिळणार?
अजित पवारांच्या जागी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची चिन्हं, मोठी जबाबदारी मिळणार?
img
Dipali Ghadwaje
पुणे  : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आल्यामुळे बँकेच्या कामकाजासाठी वेळ मिळत नसल्याने राजीनामा देत असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर आता पार्थ पवार अजित पवारांच्या जागेवर संचालक होणार असल्याची चर्चा आहे.

अजित पवारांच्या रिक्त झालेल्या जागेवर निवडणुकीचा कार्यक्रम लागेल, मात्र त्याआधीच पार्थ पवारांची अजित पवारांच्या जागी वर्णी लागण्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता अजित पवारांच्या जागी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.  कालच अजित पवारांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा 32 वर्षांनी राजीनामा दिला . त्यानंतर अजित पवारांच्या जागी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची चिन्हं आहेत. 

उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुण्याचं पालकमंत्री पद त्यांच्याकडे आहे. या कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे अजित पवारांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेवर एकहाती सत्ता गाजवली होती. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात 1991 साली याच बँकेतून केली होती. तब्बल 7 वेळा अजित पवार पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. गेल्या 32 वर्षांपासून पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाची जबाबदारी सांभाळत होते. पण त्यांनी आता संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group