१० दिवसांत ४२ कोटी भरा अन्यथा...  पार्थ पवार यांच्या कंपनीला नोटीस
१० दिवसांत ४२ कोटी भरा अन्यथा... पार्थ पवार यांच्या कंपनीला नोटीस
img
वैष्णवी सांगळे
पुणे मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात राज्याचं राजकारण चांगलंच तापल्याच पहायला मिळालं. पुणे मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला वसुलीसाठी नोटीस बजाविण्यात आली आहे. 



१० दिवसांत ४२ कोटी भरा अन्यथा जप्तीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. यासाठी मुद्रांक शुल्क वसुलीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटिशीला कंपनीकडून अद्याप प्रतिसाद देण्यात आलेला नसला तरी मुदतीच्या आत म्हणजे १० दिवसांत निर्णय घ्यावा लागणार आहे. अन्यथा कंपनीच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.  

पहिल्या खरेदीखतापोटी  २१ कोटी रुपये, तर रद्द करारनामा करण्यासाठी २१ कोटी रुपये असे एकूण ४२ कोटी रुपये भरावेत, असे कंपनीला कळविले आहे. नोटीस देऊन आता पाच दिवस उलटले आहेत. मात्र, कंपनीकडून खरेदीखत रद्द करण्याबाबत कार्यवाही झालेली नाही. 

नोटिशीनंतर पंधरा दिवसांच्या आत खरेदीखत रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. या मुदतीत कंपनीला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागासमोर बाजू मांडावी लागेल.  ती मांडल्यानंतर प्रशासनाकडून कायदेशीर बाबींचा विचार करून त्यावर निर्णय घेतला जाईल. त्यानंतर दस्तनोंदणी रद्द होऊ शकते. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group