देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार ? केंद्रीय मंत्र्यानी स्पष्टच सांगितलं, यापूर्वीही जागतिक अनिश्चिततेच्या काळात...
देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार ? केंद्रीय मंत्र्यानी स्पष्टच सांगितलं, यापूर्वीही जागतिक अनिश्चिततेच्या काळात...
img
वैष्णवी सांगळे
आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर, देशात पुन्हा 'लॉकडाऊन' लागणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरत आहेत. पंतप्रधानांच्या विधानावर तर्कवितर्क लावले जात असतानाच केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी 
देखील सोशल मिडीयावरती पोस्ट करत महत्त्वाचे विधान केले आहे. 



अशोक खरात उत्तेजक औषंधामुळे मृत्यूच्या दारात, पण वासना सुटेना ! लकव्यानंतरही... तपासात नवीन खुलासा

हरदीप सिंग पुरी यांची पोस्ट 
लॉकडाउनबाबत पसरत असलेल्या अफवा पूर्णपणे चुकीच्या आहेत. सरकारच्या पातळीवर असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सरकार देशात इंधन, ऊर्जा आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहील, यासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येक संभाव्य आव्हानाला तोंड देण्यासाठी आपण पूर्णपणे सज्ज आहोत. भारताने यापूर्वीही जागतिक अनिश्चिततेच्या काळात आपली ताकद सिद्ध केली आहे, आणि यापुढेही आपण योग्यवेळी, सक्रियपणे आणि समन्वयाने पावले उचलत राहू.​​​​​​​​​​​​​​​, अशी पोस्ट केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शेअर केली आहे.

जागतिक परिस्थिती अजूनही अनिश्चित आहे आणि आम्ही ऊर्जा, पुरवठा साखळी (सप्लाय चेन) तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आपल्या नागरिकांसाठी इंधन, ऊर्जा आणि इतर महत्त्वाच्या वस्तूंचा पुरवठा विनाअडथळा सुरू राहील याची खात्री करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत. उद्भवणाऱ्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. भारताने जागतिक अनिश्चिततेच्या काळात नेहमीच आपली कणखरता सिद्ध केली आहे आणि आम्ही यापुढेही वेळेवर, सक्रिय आणि समन्वित पद्धतीने पावले उचलत राहू.

लॉकडाऊनबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे निराधार आहेत. मला हे स्पष्ट करायचं आहे की, सध्या सरकारी पातळीवर अशा कोणत्याही प्रस्तावाचा विचार सुरु नाही. अशा नाजूक प्रसंगी, आपण सर्वांनी शांत, जबाबदार आणि एकजूट राहणे अत्यंत आवश्यक आहे.अशा परिस्थितीत, अफवा पसरवणे आणि अनावश्यक भीतीचे वातावरण निर्माण करणे हे बेजबाबदारपणाचे आणि हानिकारक कृत्य आहे, असं हरदीपसिंह पुरी यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group