कोरोनानंतर आता 'या' विषाणूनं टेंशन वाढवलं..!
कोरोनानंतर आता 'या' विषाणूनं टेंशन वाढवलं..! "या" शहराला घातला विळखा
img
Dipali Ghadwaje
पुण्यांमध्ये दिवसेंदिवस झिकाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. आतापर्यंत एकूण 66 जणांना झिकाचा संसर्ग झाला आहे. ज्यामध्ये 26 गर्भवती महिलांचा देखील समावेश आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर पुण्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मडमध्ये आली आहे. संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहान करण्यात आलं आहे.

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार आहे. हेच डास डेंग्यूही पसरवतात. साठलेल्या पाण्यात त्यांचं प्रजनन होतं आणि हे डास घरात राहण्याचं प्रमाण अधिक असतं.

झिका व्हायरस पहिल्यांदा एप्रिल 1947 मध्ये युगांडातल्या झिका जंगलांत राहणाऱ्या रीसस मकाउ माकडांत आढळला. त्यानंतर 1952 साली हा व्हायरस माणसांच्या शरीरात आला.1950पर्यंत तो केवळ आफ्रिका, आशियाच्या विषुववृत्तीय प्रदेशातच होता. 2007 ते 2016 या कालावधीत तो प्रशांत महासागराच्या प्रदेशात आणि अमेरिकेत पसरला, 2015-16मध्ये अमेरिकेने त्याला महासाथ घोषित केलं होतं. अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठणे, शरीरावर चट्टे, डोळे येणे, अशा प्रकारची लक्षणं झिका व्हायरसच्या संसर्गामुळे दिसतात.
इतर बातम्या
Join Whatsapp Group