नागरिकांनो सावधान ! देशात पुन्हा कोरोना ;
नागरिकांनो सावधान ! देशात पुन्हा कोरोना ; "या" राज्यात सर्वाधिक रुग्ण
img
Dipali Ghadwaje
देशात पुन्हा एकदा कोरोना वाढत आहे. सध्या देशात कोरोनाचे 1000 पेक्षा जास्त रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. देशात वाढत असणाऱ्या कोरोनामुळे आता आरोग्य विभाग देखील सतर्क झाले असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहे. सध्या देशात सर्वात जास्त कोरोना रुग्ण केरळमध्ये असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.


देशात 3 वर्षांनंतर कोरोनाचे 1000 पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आढळून आले आहे.  अचानक देशात कोरोना रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढत आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या केरळमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहे. केरळमध्ये सध्या 430 सक्रिय रुग्ण आहे तर महाराष्ट्रात 209, दिल्लीत 104 आणि उत्तर प्रदेशात 15 रुग्ण आढळून आले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये 12, गुजरातमध्ये 83 आणि कर्नाटकमध्ये 47 सक्रिय रुग्ण आहेत. तर दुसरीकडे आता मध्य प्रदेशात देखील कोरोना रुग्ण वाढत असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या तीन दिवसात मध्य प्रदेशात 4 कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर जानेवारीपासून आतापर्यंत 11 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 11 पैकी पाच जण इंदूरचे स्थानिक रहिवासी आहेत.

राजधानी दिल्लीत नवीन कोरोना स्ट्रोन

देशाची राजधानी दिल्लीत देखील कोरोना वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर दिल्लीत कोरोनाच्या दोन नवीन स्ट्रोनची देखील पुष्टी करण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसात दिल्लीत 99 कोरोना रुग्ण आढळून आले आहे.

कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशामध्येही कोरोना

देशात राजधानी दिल्लीसह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये देखील आता कोरोना रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढत आहे. कोरोनामुळे कर्नाटकामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून आता देखील कर्नाटकामध्ये 47 सक्रिय रुग्ण आहे. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशात 4 सक्रिय रुग्ण आहे. तर उत्तर प्रदेशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या 15 आहे.

राजस्थानमध्ये 13  रुग्ण आढळले आहेत आणि पश्चिम बंगालमध्येही कोविडचे 12 सक्रिय रुग्ण आहेत. याशिवाय मध्य प्रदेशात 2, छत्तीसगडमध्ये 1, गोव्यात 1 आणि तेलंगणामध्ये 1 रुग्ण आढळला आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group