कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसाठी टास्क फोर्सचा मोठा निर्णय
कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसाठी टास्क फोर्सचा मोठा निर्णय
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. त्यामुळे टास्क फोर्सने खबरदारी घेण्यास सुरूवात केलीये.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाची लागण झाल्यास पाच दिवस गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला टास्क फोर्सने दिला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात लवकरच नियमावली जारी करण्यात येणार आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविड टास्क फोर्सने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

यापुढे कोरोनाची लागण झाल्यास त्या व्यक्तीला ५ दिवस गृहविलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. राज्यात सध्या ८६२ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या दहा दिवसांत ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढलीये. त्यामुळे कोरोना झाल्यास आधी गृहविलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्यात. वयस्कर व्यक्ती आणि लहान मुलांना मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. तसेच अशा व्यक्तींना कुटुंबातील कोरोना झालेल्या व्यक्तींपासून दूर ठेवावे असे सांगण्यात आलेय.

राज्यात कोरोनासह जेएन १ चे रुग्ण देखील वाढत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात सध्या एकूण ८ कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळेत. बुलढाणा जिल्ह्यात नव्याने ७ कोरोना संसर्गितांची भर पडली आहे. त्यात शेगाव येथील २ चिखली येथील २ (महिला ) तर बुलढाणा शहर व तालुक्यातील एकूण ४ जणांचा समावेश आहे.

प्रदीर्घ कालावधीनंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक जानेवारी रोजी पहिला कोरोना संसर्गित आढळून आला आहे. आता नव्याने ७ जण संसर्गीत आढळल्याने एकूण संख्या ८ झाली आहे. शिरपूर येथील ५० वर्षीय कोरोना संसर्गीत महिलेल स्त्री रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group