कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय!
कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय! "बनवणारही नाही अन् विकणारही नाही , बाजारातून लस मागवली परत
img
Dipali Ghadwaje
कोव्हिशिल्ड लशीचे दुष्परिणाम समोर आल्यानंतर AstraZeneca कंपनीने नुकतेच स्पष्ट केले की, त्यांनी जगभरातील कोविड -19 लस मागे घेण्यास सुरुवात केली आहे. 

दिग्गज फार्मास्युटिकल कंपनी AstraZeneca ची Covid-19 लस जागतिक स्तरावर मागे घेतली जात आहे. यापूर्वी कंपनीने न्यायालयीन कागदपत्रांमध्ये कबूल केले होते की, त्यांनी निर्मित केलेल्या कोव्हिशिल्ड लशीचे दुष्परिणाम होऊ शकतात. 

त्यानंतर आता कंपनीने म्हटले आहे की, व्यावसायिक कारणास्तव ही लस बाजारातून काढून टाकली जात आहे. कंपनीने सांगितले की, यापुढे या लशीची निर्मिती किंवा विक्री केली जाणार नाही, असे वृत्त एका संस्थेने मंगळवारी दिले होते.

अँग्लो-स्वीडिश औषध निर्मात्या कंपनीने न्यायालयाला दिलेल्या कागदपत्रांमध्ये यापूर्वी कबूल केले आहे की, लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या आणि रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होणे यासारखे दुष्परिणाम होतात. एका संस्थेनेच्या वृत्तानुसार, लस मागे घेण्याचा फर्मचा अर्ज 5 मार्च रोजी करण्यात आला होता आणि तो 7 मे रोजी लागू झाला. 

लंडनमध्ये सूचीबद्ध असलेल्या AstraZeneca ने कोविड-19 औषधांच्या विक्रीत घट झाल्यानंतर, गेल्या वर्षी व्हायरस लस आणि लठ्ठपणाच्या औषधांची निर्मिती करण्यास सुरुवात केली होती. 

 AstraZeneca ने कोरोनावर उपचार म्हणून Vaxzevria ही लस निर्माण केले होती. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने देखील उत्पादित केली आहे, ती भारतात Covishield नावाने विकली गेली. 

कोविशील्ड लसीचे दुष्परिणाम तपासण्यासाठी वैद्यकीय तज्ञ पॅनेल तयार करण्याचे निर्देश जारी करण्याच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. वकील विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली होती, ज्यांनी साथीच्या आजाराच्या काळात लसीकरण मोहिमेमुळे गंभीरपणे अक्षम झालेल्या नागरिकांसाठी लस नुकसान भरपाई प्रणाली स्थापन करण्यासाठी केंद्राला निर्देश द्यावेत, अशी विनंती न्यायालयाला केली होती.

“जागतिक साथीच्या रोगाचा अंत करण्यासाठी वॅक्सझेव्हरियाने बजावलेल्या भूमिकेचा आम्हाला अभिमान आहे. अंदाजानुसार, याच्या वापराच्या पहिल्या वर्षात 6.5 दशलक्षाहून अधिक जीव वाचवले गेले आणि जागतिक स्तरावर तीन अब्जाहून अधिक डोस पुरवले गेले. आमच्या प्रयत्नांना जगभरातील सरकारांनी मान्यता दिली आहे आणि जागतिक साथीच्या रोगाचा अंत करण्यासाठी हा एक महत्त्वाचा घटक म्हणून व्यापकपणे ओळखला जातो, ” असे ॲस्ट्राझेनेकाने म्हटल्याचे वृत्त एका वृत्त संस्थेने दिले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group