नाशिक :- नाशिक शहरातील काही भागांत पुन्हा 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत नाशिककरांना पाणी बाणी चा सामना करावा लागणार आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्रास बारा बंगला पंपिंग येथून १२०० मी.मी व्यासाच्या पाईपलाईनद्वारे रॉ वॉटर पाणी पुरवठा होत आहे. गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्राची जलशुध्दीकरण क्षमता ही ५२ एम.एल.डी. आहे.
हे जलशुध्दीकरण केंद्र उभारल्या नंतर जागेची अडचण विचारात घेता नव्याने सम्प उभारण्यात आलेला नाही. या जलशुध्दीकरण केंद्राद्वारे गांधीनगर येथील चार जलकुंभ, आय. टी. पार्क, विद्याविहार, कल्पतरू, इच्छामणी व शिवशक्ती जलकुंभ भरण्यात येतात.
तसेच प्र.क्र. १६.२३ व ३० मधील भागशः नाशिकरोड येथील परिसरात पाणी पुरवठा करण्यात येतो वरील वाढीव पाण्याची मागणी पुरविणे कामी सदर ठिकाणी गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथे ११ लक्ष लिटर क्षमतेचा GSR बांधण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. सद्य:स्थितीत अस्तित्वातील असलेला सम्प उपरोक्त बांधण्यात आलेल्या सम्प हाउस यांना जोडणे करीता वेळेची उपलब्धता, कामाचे प्रत्यक्ष जागेवरील व्याप्ती इ.चा विचार करता ते एम. एस. पाईप लाईनद्वारे करणे आवश्यक आहे.
या जलशुध्दीकरण केंद्राचा स्थापित क्षमतेचा पूर्व वापर होण्याच्या दृष्टीने तांत्रिक तपासणी केली असता ६०० मी.मी. व्यासाचा पाईप आवश्यक आहे. तसेच ६०० मी.मी. व्यासाचा एम. एस पाईप उपलब्ध असल्याने काम करणे सुलभ होणार आहे. हे काम करतांना core cutter द्वारे सम्प हाउस यांना सुमारे ९०० मी.मी व्यासाचे छिद्र पाडणे, एम. एस. पाईप ले (Laying) करणे नंतर कॉन्क्रीट करणे इ. कामास सुमारे १२ तास आवश्यक आहे.
नंतर कॉक्रीटचे curing / setting / early strength to retain water इ. करीता सुमारे २४ तास कालावधी तांत्रिकदृष्टया अत्यंत आवश्यक आहे. यास्तव सदर कामास सुमारे ३६ तास आवश्यक असल्याने गुरुवार दि. १६ नोव्हेंबर व शुक्रवार दि.१७ नोव्हेंबर या कालावधीकरिता खालील भागातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
गुरुवार दिनांक 16/11/2023 रोजी पाणी पुरवठा बंद राहणारा परिसर
प्रभाग क्र 17 लोखंडे मळा, खर्जुल मळा सप्तश्रृंगी नगर, शिवराम नगर, टाकळी रोड परिसर, इच्छामणी नगर, कॅनोल रोड,नारायण बापू नगर, चंपानगरी, गोदावरी सोसा., दसकगाव, शिवाजी नगर, एम.एस.सी.बी कॉलनी नवरंग कॉलनी, वाघेश्वरी नगर व प्रभाग 17 मधील इतर परीसरात.
प्रभाग क्र.18- शिवाजी नगर, मॉडल कॉलनी, अयोध्दा कॉलनी, पवारवाडी , इंगळे चौक, पंचक गांव सायखेडा रोड, भगवा चौक, शिवशक्ती नगर, वाघेश्रवर नगर, बालाजी नगर, भगवती लॉन्स परीसर, प्रभाग 18 मधील इतर परीसरात.
प्रभाग क्र.19- गोरीवाडी, चेहडी परीसर, नाशिक पुना हायवे, एकलहरा रोड, सामनगाव प्रभाग 19 मधील इतर परीसरात.
प्रभाग क्र.20- पुनारोड, दावखर वाडी, जयभवानी रोड, अश्विन कॉलनी, जेतवन नगर, बिटको कॉलेज तरणतलाव. प्रभाग 20 मधील इतर परीसरात.
प्रभाग क्र.21- जयभवानी रोड, सहाणे मळा, लवटे नगर 1 व 2,रोकडोबा कॉलनी, आर्टीलरी सेंटर रोड, दत्तमंदीर रोड. प्रभाग 21 मधील इतर परीसरात.
प्रभाग क्र.22- विहितगाव सौभाग्य नगर, लॉमरोड, वडनेर गाव परीसर, वडनेर रोड परिसर प्रभाग 22 मधील इतर परीसरात.
प्रभाग क्र. 23 श्री.श्री. पंडीत रविशंकर मार्ग, पखाल रोड, खोडे नगर, निसर्ग कॉलनी, विधाते नगर, बँक कॉलनी, डी.जी.पी. नगर, अशोका मार्ग, वडाळा रोड, जयदिप नगर, साईनाथ नगर, अमृत वर्षा कॉलनी, गणेशबाबा नगर, कल्पतरु नगर, आदित्य नगर, रॉयल कॉलनी, रजा कॉलनी, रेहनुमा नगर, गोदावरी नगर, ममता नगर व इतर परिसर
प्रभाग क्र. 30 वडाळा गांव
शुक्रवार दिनांक 17/11/2023 रोजी पाणी पुरवठा बंद रहाणारा परिसर
प्रभाग क्र. 16 उपनगर, शांतीपार्क, अयोध्या नगर, मातोश्री नगर, शिवाजी नगर, आर.टी वो कॉलनी तोरणा सोसा., समता नगर, टाकळी गाव, रामदास स्वामी, उत्तरा नगर, आदीवासी वाडा, जयभवानी नगर, पगारे मळा रामदास स्वामी नगर, श्रम नगर 1 व 2, सिंधी चाळ इच्छामणी मंदीर परिसर, मकरंद कॉलनी, रघुवीर कॉलनी, आंबेडकर नगर, पंचशील नगर, राहुल नगर, शांती पार्क,पंजाब चाळ, रामदास स्वामी मठ, व संपुर्ण प्रभाग क्र. 16 मधील इतर परिसर
प्रभाग क्र 17 लोखंडे मळा, खर्जुल मळा सप्तश्रृंगी नगर, शिवराम नगर, टाकळी रोड परिसर, इच्छामणी नगर, कॅनोल रोड,नारायण बापू नगर, चंपानगरी, गोदावरी सोसा., दसकगाव, शिवाजी नगर, एम.एस.सी.बी कॉलनी नवरंग कॉलनी, वाघेश्वरी नगर व प्रभाग 17 मधील इतर परीसरात.
प्रभाग क्र.18- शिवाजी नगर, मॉडल कॉलनी, अयोध्दा कॉलनी,पवारवाडी , इंगळे चौक, पंचक गांव सायखेडा रोड, भगवा चौक, शिवशक्ती नगर, वाघेश्रवर नगर, बालाजी नगर, भगवती लॉन्स परीसर, प्रभाग 18 मधील इतर परीसरात.
प्रभाग क्र.19- गोरीवाडी, चेहडी परीसर, नाशिक पुना हायवे, एकलहरा रोड, सामनगाव प्रभाग 19 मधील इतर परीसरात.
प्रभाग क्र.20- पुनारोड, दावखर वाडी, जयभवानी रोड, अश्विन कॉलनी, जेतवन नगर, बिटको कॉलेज तरणतलाव.
प्रभाग 20 मधील इतर परीसरात.
प्रभाग क्र.21- जयभवानी रोड, सहाणे मळा, लवटे नगर 1 व 2,रोकडोबा कॉलनी, आर्टीलरी सेंटर रोड, दत्तमंदीर रोड. प्रभाग 21 मधील इतर परीसरात.
प्रभाग क्र.22- विहितगाव सौभाग्य नगर, लॉमरोड, वडनेर गाव परीसर, वडनेर रोड परिसर प्रभाग 22 मधील इतर परीसरात.
प्रभाग क्र. 23 श्री.श्री. पंडीत रविशंकर मार्ग, पखाल रोड, खोडे नगर, निसर्ग कॉलनी, विधाते नगर, बँक कॉलनी, डी.जी.पी. नगर, अशोका मार्ग, वडाळा रोड, जयदिप नगर, साईनाथ नगर, अमृत वर्षा कॉलनी, गणेशबाबा नगर, कल्पतरु नगर, आदित्य नगर, रॉयल कॉलनी, रजा कॉलनी, रेहनुमा नगर, गोदावरी नगर, ममता नगर, टागोर नगर, बोधले नगर, बजरंग वाडी, हिरे नगर, हॅपी होम कॉलनी, आनंद नगर, गोदावरी नगर, तुलसी आय हॉस्पीटल परिसर व इतर
परिसर प्रभाग क्र. ३० वडाळा गांव
तरी शनिवार दि. 18/11/2023 रोजीचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे मनपाच्या वतीने कळविण्यात आले आहे.