मोकाट गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू; नाशिक जिल्ह्यातील घटना
मोकाट गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू; नाशिक जिल्ह्यातील घटना
img
दैनिक भ्रमर

मोकाट दोन गायींच्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कळवणमध्ये घडली. या प्रकारामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कळवण शहरातील जुना ओतूररोडवरील  श्री सायबर कॅफेसमोर मोकाट जनावरांपैकी दोन गायी एकमेकांना भिडल्या. यावेळी भालचंद्र रघुनाथ मालपुरे (वय ८५,  रा. छत्रपती शिवाजीनगर, कळवण) हे रस्त्याने जात असतांना या गायींनी मालपुरे यांना शिंगाने खाली पाडले नंतर त्यांना पायाखाली तुडवले.

दरम्यान, यामुळे गंभीर जखमी झालेल्या मालपुरे यांना नागरिकांनी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
इतर बातम्या
नाशिकरोडचे

Join Whatsapp Group