मनपा निवडणुकीसाठी शासनाचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित;
मनपा निवडणुकीसाठी शासनाचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित; "असा" आहे कार्यक्रम
img
चंद्रशेखर गोसावी

नाशिक - महानगरपालिकेच्या आगामी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्यासाठी म्हणून शासनाने निर्धारित कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे. याबाबतचा आदेश  काढण्यात आला असून त्यानुसार आता राज्यातील अ, ब, क, ड महानगरपालिकांनी आपली प्रभाग रचना तयार करणे आणि त्याची घोषणा करावयाची आहे.

11 जून पासून 16 जून पर्यंत प्रारूप प्रभाग रचना तयार करावयाची आहे. तर 17 आणि 18 जून रोजी जनगणनेची माहिती प्राप्त करावयाची आहे. 19 ते 23 जून पर्यंत प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून माहिती संकलित करावयाची आहे. 24 ते 30 जून पर्यंत प्रत्यक्ष गुगल मॅप वर प्रभागाचा नकाशा तयार करावयाचा आहे.

1 ते 3 जुलै पर्यंत प्रत्यक्ष प्रभाग रचनेवरच्या जागेवर जाणे आणि पाहणी करण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे. दि. 4 ते 7 जुलै प्रभाग रचनेवर स्वाक्षऱ्या करावयाच्या आहे. 8 ते 10 जुलै पर्यंत हे सर्व राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवायचे आहे.

22 जुलै ते 31 जुलै पर्यंत प्रभाग रचना प्रसिद्ध करणे त्यावर हरकती सूचना स्वीकारावयाचे आहेत. या हरकतींवर 11 ऑगस्टपर्यंत शासनाने नियुक्त करून दिलेल्या अधिकाऱ्याने सुनावणी करावयाची आहे त्यानंतर 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत प्रभाग रचनेची घोषणा होणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group