विमान अपघातानंतर एअर इंडियाने ट्विट करत दिली
विमान अपघातानंतर एअर इंडियाने ट्विट करत दिली
img
दैनिक भ्रमर
गुजरातमधील अहमदाबादमध्ये लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला आज मोठा अपघात झाला आहे.

अहमदाबादमध्ये टेकऑफनंतर काही मिनिटांमध्ये हा अपघात झाला. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या विमानात क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते. या घटनेत किती जीवितहानी झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र काही जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर एअर इंडिय़ा कंपनीने या अपघाताबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.

यात कंपनीने म्हटले की, “अहमदाबादवरुन लंडनला जाणाऱ्या AI171 या विमानाचा आज १२ जून २०२५ रोजी अपघात झाला आहे. सध्या आम्ही तपशीलांची पडताळणी करत आहोत आणि लवकरच पुढील अपडेट्स http://airindia.com आणि आमच्या X हँडलवर (https://x.com/airindia) शेअर करू.

इतर बातम्या
Join Whatsapp Group