सिडकोतील राजकीय पदाधिकार्‍याच्या समर्थकांची विद्यमान महिला आमदारांविराधात आक्षेपार्ह पोस्ट
सिडकोतील राजकीय पदाधिकार्‍याच्या समर्थकांची विद्यमान महिला आमदारांविराधात आक्षेपार्ह पोस्ट
img
Prashant Nirantar



नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- विद्यमान लोकप्रतिनिधीविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट इन्स्टाग्रामवर व्हायरल करून बदनामीचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी राकेश शिवाजी ढोमसे (रा. डॉ. हेडगेवारनगर, त्रिमूर्ती चौक, सिडको) हे काल (दि. 5) सकाळी 9 वाजेच्या सुमारास घरी होते. त्यावेळी त्यांनी मोबाईल फोनवरील इन्स्टाग्राम अकाऊंट उघडून पाहिले. त्यावेळी ठोमसे यांचा इन्स्टाग्राम मित्र अंकुश शेवाळे याची एक स्टोरी दिसली.

युवकाला नाश्ता पडला पाच लाखांना

त्यात एक फोटो असून, त्यावर तीन कुत्र्यांचे चित्र, त्याच्याखाली मराठीत दोन टॉमी व एक मामी असे लिहून इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले दिसले. त्यानंतर ठोमसे यांनी आणखी काही स्टोरीज् पाहिल्या असता फिर्यादींना गणेश दराडे व धीरज राजपूत यांनीही अशीच पोस्ट त्यांच्या इन्स्टाग्रामवर टाकलेली दिसली. त्यावरून ठोमसे यांना असे समजले, की ही पोस्ट आरोपी अंकुश शेवाळे, गणेश दराडे व धीरज राजपूत यांनी आ. सीमा हिरे यांना उद्देशून दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांत वाद निर्माण करण्याच्या उद्देशाने ही पोस्ट व्हायरल केल्याचे लक्षात आले. 

हेही वाचा : नाशिकच्या "या" यात्रा कंपनीने चारधाम यात्रेसाठी पैसे घेत 16 भाविकांची केली फसवणूक

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घुणावत करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group