युवकाला नाश्ता पडला पाच लाखांना
युवकाला नाश्ता पडला पाच लाखांना
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाश्ता करण्यासाठी थांबलेल्या एका तरुणाच्या कारच्या मागील दरवाजाची काच फोडून अज्ञात चोरट्याने पाठीमागील सीटवर असलेली पाच लाखांची रोकड असलेली बॅग चोरून नेल्याची घटना गंगापूर रोड येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी दर्शन चंद्रशेखर सोनार (रा. सिद्धिविनायक कॉलनी, सावतानगर, नाशिक) हे गंगापूर रोडवरील शहीद सर्कलजवळ असलेल्या अम्माज टिफिन कप्पी हॉटेल येथे नाश्ता करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी जे. एस. 6566 या क्रमांकाची महिंद्रा बोलेरो गाडी हॉटेलसमोरील पार्किंगमध्ये उभी केली होती.

नाश्ता करण्यापूर्वी सोनार यांनी मजुरांना देण्यासाठी एसबीआय बँकेतून काढून आणलेली 4 लाख 80 हजार रुपयांची रोकड लेदर बॅगेमध्ये ठेवली होती व ती बॅग गाडीच्या पाठीमागे ठेवलेली असताना अज्ञात चोरट्याने सोनार हे नाश्ता करण्यासाठी गेल्याची संधी साधून गाडीच्या डाव्या बाजूची मागील दरवाजाची काच फोडून मागील सीटवर ठेवलेली सुमारे पाच लाख रुपयांची रोकड लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. 

सिडकोतील राजकीय पदाधिकार्‍याच्या समर्थकांची विद्यमान महिला आमदारांविराधात आक्षेपार्ह पोस्ट

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group