Nashik : आधी नाव बदलले, नंतर महिलेशी जवळीक वाढवून शरीरसंबंध प्रस्थापित केले अन् मग...
Nashik : आधी नाव बदलले, नंतर महिलेशी जवळीक वाढवून शरीरसंबंध प्रस्थापित केले अन् मग...
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- हिंदू नाव धारण करून महिलेशी ओळख निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला धर्मांतरासाठी धमकी देणार्‍या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही श्रमिकनगर परिसरात राहते. त्यांच्या ओळखीचा आरोपी मोहंमद आलम (वय ३७, रा. सातपूर) याने त्याचे नाव राजू असून, तो हिंदू असल्याचे भासवून महिलेशी ओळख निर्माण केली. त्यानंतर महिलेला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिला फसवून महिलेशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

काही दिवसांनी आरोपीपासून महिलेला मूल झाल्यानंतर फिर्यादीसह मुलाची जबाबदारी घेण्यास आरोपी मोहंमद आलम याने टाळाटाळ केली, तसेच शिवीगाळ व मारहाण करून घरखर्चासाठी महिलेने पैसे दिले नाहीत, तर तिला घराबाहेर काढून टाकण्याची धमकी दिली, तसेच लग्न करायचे असेल, तर तुला मुस्लिम धर्माप्रमाणे वागावे लागेल, असे सांगून महिलेला घराबाहेर काढून दिले.

हा प्रकार सन २०१३ ते दि. ३ जून २०२५ या कालावधीत श्रमिकनगर येथे घडला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मोहंमद आलमविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नळकांडे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group