नाशिकमध्ये 11 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
नाशिकमध्ये 11 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- नाशिक शहरातील पोलीस ठाण्यांच्या 11 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांचे आदेश आज सायंकाळी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी काढले आहेत.

मधुकर कड यांची बदली पंचवटी पोलीस ठाण्याहून अंबड पोलीस ठाण्यात झाली आहे. गजेंद्र पाटील यांची भद्रकाली वरून पंचवटी पोलीस ठाण्यात, राकेश चौधरी यांची अंबड वरून भद्रकाली पोलीस ठाण्यात, जितेंद्र सपकाळे यांची उपनगर वरून नाशिकरोडला, अशोक गिरी यांची नाशिकरोड वरून सरकारवाडा (दुय्यम), जयंत शिरसाठ यांची देवळाली कॅम्प वरून उपनगरला, त्यांच्या जागी भद्रकाली पोलीस ठाण्याचे श्रीनिवास देशमुख, मनोहर कारंडे चुचाळे चौकी ते अंबड (दुय्यम), विश्वास पाटील यांची सातपूर वरून चूचाळे चौकीत, संजय पिसे यांची नियंत्रण कक्षातून आडगाव पोलीस ठाण्यात, सचिन खैरनार यांची आडगाव वरून अंबड (दुय्यम). अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांना अद्याप नियुक्तीच्या प्रतीक्षेत नियंत्रण कक्षात ठेवण्यात आले आहे.
इतर बातम्या
नाशिकरोडचे

Join Whatsapp Group