
२९ मे २०२५
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- दिवस-रात्र वर्दळ असलेल्या नाशिक रोडच्या मुक्तिधाम मंदिरसमोरील शिवम कॉम्प्लेक्स येथे झाडावर सात फुटाची धामण आढळल्याने एकच खळबळ उडाली.
मनसेचे नाशिक शहर उपाध्यक्ष अॅड. नितीन पंडित यांना आपल्या कार्यालया समोरील झाडावर दुपारी धामण जातीचा मोठा साप आढळला. त्यांनी त्वरित सर्पमित्र सलमान शेख यांना फोन करून बोलावले.
सलमान शेख व त्यांचे सहकारी आदित्य जारस यांनी धामणला पकडले. यावेळी बघ्यांची गर्दी झाल्याने धामण घाबरली होती. साप दिसल्यास घाबरून न जाता त्याला मारू नका, सर्पमित्रांना बोलावून त्याच्याव्दारे पकडून वनात सोडा असे आवाहन अँड नितीन पंडित यांनी केले.
Copyright ©2025 Bhramar