नाशिक :- अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे विद्युत पुरावठ्यावर देखील परिणाम झालेला पाहिला मिळाले. तसेच पावसाळा पूर्वीची देखभालीची कामे महावितरणने हाती घेतली आहेत.
उद्या दि.२९ मे रोजी सकाळी ९.३० ते १ वाजेपर्यंत शालीमार उपकेंद्रातील ११ केव्ही राजे बहादूर वाहिनीवरील वीज पुरवठा देखभाल दुरुस्ती कामांसाठी बंद राहणार आहे.
यामध्ये राजे बहाद्दर लेन, फावडे लेन, चांदवडकर लेन, महात्मा गांधी रोड, वकील वाडी, घनकर लेन, रेडक्रॉस आणि देवधर लेन या भागाचा समावेश आहे.
ग्राहकांनी याची नोंद घेऊन महावितरण कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण तर्फे करण्यात आले आहे.