३ जून २०२५
नाशिकमध्ये पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
माजी खासदार हेमंत गोडसे हे काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. आज परतल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला.
त्यांनी कोविड चाचणी केली असता ती पोझीटिव्ह आली. जिल्हा रुग्णालयाकडून ते राहत असलेल्या परिसरात स्क्रीनिंग सुरु केले असल्याचे समजते. राज्यात कोरोना ठिकठिकाणी वाढत चालला आहे.
त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याची गरज आहे.
Copyright ©2026 Bhramar