नाशिक - होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी नाशिकची महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय राज्याच्या नगर विकास विभागाने घेतला आहे. त्याबाबतचा आदेश आज उशिरा प्रकाशित करण्यात आलेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीने होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखडा संदर्भामध्ये धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. मंगळवारी रात्री उशिरा राज्य सरकारच्या नगर रचना विभागाने प्रकाशित केलेल्या अध्यादेशानुसार नाशिक मध्ये चार सदस्य प्रभाग रचना होणार आहे.
त्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीप्रमाणे कामकाज करावयाचे आहे हे आदेशामध्ये नगर विकास विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने उचललेले अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.