
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मैत्रीचे संबंध तोडून बोलत नसल्याचा राग आल्याने एका तरुणाने महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून तिच्या मुलांना मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही श्रमिकनगर परिसरात राहते. आरोपी काझिम अन्सारी (वय 22, रा. अशोकनगर, सातपूर) व फिर्यादी महिला यांच्यात मैत्रीचे संबंध होते; मात्र हे संबंध महिलेने तोडून त्याच्याशी बोलत नसल्याचा राग आल्याने आरोपी काझिम हा तिच्या राहत्या घरी आला.
त्याने महिलेस शिवीगाळ व मारहाण केली, तसेच महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास महिलेसह तिच्या मुलांना मारण्याची धमकी दिली. पीडित आणि आरोपी यांची ओळख इंस्टाग्राम वर झाली होती. या दोघांचे नंतर प्रेमप्रकरण सुरु झाले. नंतर हे नाते तुटले अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
या प्रकरणी काझिम अन्सारीविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बरेला करीत आहेत.