पंचवटी कारंजा येथील वाड्याला भीषण आग
पंचवटी कारंजा येथील वाड्याला भीषण आग
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पंचवटी कारंजा येथील वाड्याला भीषण आग लागली. ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अग्निशमन विभाग करीत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की पंचवटी कारंजा येथील ‘माधवजी का चिवडा’ दुकान असलेल्या वाड्याला दुपारी पाऊन  वाजेच्या सुमारास अचानक वरच्या मजल्यावर ती आग लागली. या आगीच्या ठिणग्या जवळच असलेल्या हातगाडीवरदेखील पडल्या. ही आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती पंचवटी भाजपाचे ब्लॉक अध्यक्ष राहुल कुलकर्णी त्यांनी तातडीने अग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या पंचवटी अग्निशमन केंद्राचे दोन आणि के. के. वाघ परिसरातील केंद्राचा एक असे तीन बंब या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group