नाशिक ते मुंबई लोकल लवकरच धावणार? नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी
नाशिक ते मुंबई लोकल लवकरच धावणार? नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी
img
Dipali Ghadwaje
मुंबई आणि नाशिक दरम्यान दररोज हजारो नागरिक प्रवास करत असतात. विशेषतः नोकरदार वर्गासाठी ही वाट खूप महत्त्वाची आहे. आता या मार्गावरून नाशिक ते मुंबई लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण कसारा घाटातील मोठी अडचण दूर झाली असून नव्या रेल्वे मार्गाला अंतिम मंजुरी मिळणार आहे.

मुंबईत कामानिमित्त दररोज हजारो लोक प्रवास करतात. अनेकजण मुंबई-नाशिक असा एक्स्प्रेसने प्रवास करतात. पंचवटी एक्स्प्रेससह अशा अनेक रेल्वे आहेत ज्यातून नोकरदरावर्ग दररोज प्रवास करतात. या नोकरदारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 

नाशिकपर्यंत थेट लोकल सुरू होण्यासाठी कसारा घाटाची अडचण होती. मात्र आता ही अडचण दूर होणार आहे. मनमाड ते कसारा या नव्या रेल्वेमार्गाला अंतिम मंजुरी मिळणार आहे. या मार्गावर दोन मोठे बोगदे आणि कमी चढ-उतार असल्यामुळं रेल्वे वाहतुकीला गती मिळणार आहे. तसंच, नागरिकांचा प्रवासदेखील आरामदायी आणि सोप्पा होणार आहे. 

कसा आहे कसारा घाट ते मनमाड रेल्वे मार्ग
कसारा घाट ते मनमाड रेल्वे मार्ग 140 किमीचा असून या मार्गावर सामांतर रेल्वे ट्रॅक टाकला जाणार आहे. या नव्या रेल्वे लाईनमुळं बोगद्यांचा डायमीटर वाढवला जाणार आहे. इगतपुरी-कसारा दरम्यानचा घाट रस्त्यात ही रेल्वे लाइनचे काम केल्यास रेल्वे प्रवास अधिक जलद होणार आहे. तसंच, नाशिक-मुंबई दरम्यान लोकल सेवादेखील यामुळं सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

चार नवीन रेल्वे स्थानक होणार आहेत
आता कसारा घाट ते मनमाड दरम्यान नवीन रेल्वे ट्रॅक टाकला जाणार आहे. 140 किलोमीटरच्या मार्गावर हा समांतर रेल्वे ट्रॅक टाकला जाणार आहे. मध्य रेल्वेने याबाबत प्राथमिक आराखडा तयार केल्याची माहिती समोर येत आहे. नवीन मार्गावर न्यू नाशिकरोड, न्यू पाडळी, वैतरणानगर, चिंचलखैरे ही चार नवीन स्थानके तयार होणार आहेत. 

या रेल्वे मार्गावर 12 बोगदे तयार होणार आहेत. नवीन रेल्वे लाईनमुळं वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. नवीन रेल्वे मार्गामुळं नवीन रेल्वे मार्गामुळे दळणवळण सुलभ होण्यास मदत होणार आहे. यासाठी मध्य रेल्वेने सुमारे चार हजार कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group