नाशिक :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष मा.डॉ.अपूर्व हिरे यांचा भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेशाबाबत राजकीय क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती.
या चर्चांना पूर्ण विराम मिळाला असून येत्या बुधवार, दि.2 जुलै रोजी मुंबई येथे भाजपाच्या प्रदेश कार्यालयात दुपारी 12 वा. डॉ.अपूर्व हिरे यांचा आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, जि.प.सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक पदाधिका-यांसह पक्ष प्रवेश सोहळा निश्चित करण्यात आला आहे.
नुकतेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी थेट दुरध्वनीकरून डॉ.अपूर्वभाऊ हिरे यांना पक्षात अधिकृत प्रवेशासाठी आमंत्रित केलेले होते. यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस व राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांची मुंबई येथे भेट घेऊन चर्चा देखील झाली असून त्यांनतर पक्षात अधिकृत प्रवेशाची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे अधिकृत आमंत्रण व आपल्या ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तसेच आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर शहरी व ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीकोनातून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याचे माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे यांनी सांगितले.
या पक्ष प्रवेश सोहळ्या साठी नाशिक जिल्हयातील ग्रामीण भागातून तसेच नाशिक शहरातून हजारो कार्यकर्ते मुंबई येथे उपस्थित राहणार आहेत.