Nashik :
Nashik : "या" शुल्लक कारणातून दोघांना चाकूने भोसकले
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सिगारेटचे पैसे न दिल्याच्या रागातून दोन युवकांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पंचवटी परिसरात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी अनंता राजेंद्र पाटील (वय 24, रा. पंचवटी, नाशिक) हा त्याचा मित्र ऋतिक बाळासाहेब डोंगरे (वय 22) याच्यासोबत दि. 25 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पंचवटीतील अमरधाम गार्डनच्या कोपर्‍यावर एका पानटपरीजवळ सिगारेट घेऊन उभे होते.

त्यावेळी आरोपी मयूर उर्फ मया शिवाजी घातके, अत्तर बादशहा व बंटी असे तिघे त्यांच्याजवळ आले. तुम्ही सिगारेटचे पैसे का देत नाही, असे म्हणत अत्तर व बंटी यांनी फिर्यादी व त्याच्या मित्राला शिवीगाळ करुन मारहाण केली.

त्यावेळी मयूरने त्याच्या कमरेला लावलेला चाकू काढून ऋतिकच्या पोटात खुपसून त्याला गंभीर जखमी केले. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी फिर्यादी अनंता पाटील मध्ये पडले असता मयूरने त्याच चाकूने अनंताच्या पोटात चोकू खुपसून त्यालाही जखमी केले.

याप्रकरणी अनंता पाटील यांच्या फिर्यादीवरुन पंचवटी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नेमाणे करीत आहे.
इतर बातम्या
नाशिकरोडचे

Join Whatsapp Group