शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांना मातृशोक
शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांना मातृशोक
img
दैनिक भ्रमर

 नाशिक ( प्रतिनिधी) शिवसेनेचे उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या मातोश्री श्रीमती रजनी भास्करराव बोरस्ते (वय ७४) यांचे आज दुपारी साडेबारा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

श्रीमती रजनी बोरस्ते यांच्या प्रकृतीत वृद्धापकाळाने बिघाड झाल्याने त्यांना मागील शुक्रवारी पंडित कॉलनी येथील श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर गेल्या सहा दिवसापासून उपचार केले जात होते.

श्रीमती रजनी बोरस्ते ह्या महिला विकास बँकेच्या तसेच रजनी गृह उद्योगाच्या संचालिका होत्या. पीपल्स बँकेचे माजी संचालक भास्करराव बोरस्ते यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे, दिर, भावजय असा मोठा परिवार आहे. 

आज दुपारी 4.30 वाजता त्यांच्या पंडित कॉलनी येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. बोरस्ते परिवाराच्या दुःखात भ्रमर परिवार सहभागी आहे.
इतर बातम्या
नाशिकरोडचे

Join Whatsapp Group