मनमाड (प्रतिनिधी) :- मनमाड-नांदगाव मार्गावर हिसवळ शिवारात पिकअप व मोटर सायकलच्या अपघातात कऱ्ही येथील चुलता पुतणी जखमी झाले आहे.
दरम्यान वेहळगाव येथील आशा सेविका ज्योती चेतन केदार (वय २८) या कऱ्ही माहेरी आलेल्या होत्या.त्यांची नांदगाव येथे मिटिंग असल्याने चुलते महेश काकड यांच्या सोबत त्या नांदगाव येथे गेल्या होत्या.
मीटिंग आवरून घरी परतत असताना समोररून कुंपण जाळीने भरून येणारी पिकअप नंबर एमएच १५ एच एच-१२३९ ही गाडी समोरून नागमोडी पद्धतीने येत असल्याने मोटरसायकल चालकाला काही कळेना त्याने स्पीड कमी केले मात्र पिकअपने समोरून येऊन धडक दिली त्यात मोटरसायकलस्वार महेश काकड रा.कऱ्ही व त्यांच्या मागे बसलेली पुतणी ज्योती केदार रा. वेहळगाव हे जखमी झाले आहे.
त्यांना तत्काळ मनमाड येथे दाखल करण्यात आले परंतु सौ.ज्योती केदार यांना डोक्याला,डाव्यापायाला व खांद्याला जबर मार लागलेला असल्याने त्यांची परिस्थिती गंभीर असून त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे.तर चुलत्यावर मनमाड येथे उपचार सुरु आहे.