राज्यातील 82 पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्यातील 82 पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक - राज्यातील 82 पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयातील 2 पोलीस उपायुक्तांची तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकांची देखील बदली झाली आहे. 

राज्य शासनाच्या गृह विभागाने आज सायंकाळी 82 पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये नाशिकच्या पोलीस आयुक्तलयातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांची पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे तर पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांची धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे पोलीस अधीक्षक या पदावर बदली करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शमिष्ठा वालावालकर यांची छत्रपती संभाजी नगर पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त या पदावर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकच्या गुप्तवार्ता विभागामध्ये उपायुक्त असलेल्या गीता चव्हाण यांची महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये पोलीस अधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा विभागामध्ये गुप्तवार्ता विभागात पोलीस अधीक्षक असलेले योगेश चव्हाण यांची नाशिक पोलीस आयुक्तालयात उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. धुळे येथे अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत असलेले किशोर काळे यांची बदली नाशिक शहरात पोलीस उपायुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे.

तर अहिल्यानगर येथे कार्यरत असलेले प्रशांत खैरे यांची बदली महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर करण्यात आली आहे. अनिकेत भारती यांची नियुक्ती गुप्त वार्ता विभागाच्या उपायुक्तपदी करण्यात आली आहे. नाशिकच्या नागरी हक्क संरक्षण विभागामध्ये कार्यरत असलेले अण्णासाहेब जाधव यांची बदली अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज येथे करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये कार्यरत असलेले प्रदीप जाधव यांची बदली गुप्त वार्ता विभाग, अमरावती येथे करण्यात आलेली आहे.

संपूर्ण यादी वाचण्यासाठी खाली क्लिक करा

अटॅचमेंट पहा
इतर बातम्या
नाशिकरोडचे

Join Whatsapp Group