नाशिक :- मनपाचे मुकणे रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड सबस्टेशनमध्ये महावितरण कंपनीमार्फत शनिवार दि. १४ रोजी विविध पावसाळापूर्व दुरुस्ती कामे करण्यात येणार आहेत.
महावितरण कंपनीकडून शनिवार दि. १४ रोजी सकाळी १० वा. ते दु. ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मनपाचे मुकणे रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथून विल्होळी जलशुध्दीकरण केंद्राला होणारा पाणीपुरवठा शक्य होणार नाही.
त्यामुळे, शनिवार दि. १४ रोजी सकाळी १० वा. ते दु. ३ वाजेपर्यंत मनपाच्या विल्होळी जलशुब्दीकरण केंद्र येथून नाशिक शहरातील नवीन नाशिक व नाशिक पूर्व भागास पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही.
याची नागरिकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.