
४ जुलै २०२५
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक शहर व परिसरात हल्ली अनेक वेळा बिबटे दिसून येत आहेत. आज पहाटे देवळाली कॅम्प परिसरात दोन वेगवेगळे दोन बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
पहिला बिबट्या बार्न्स स्कूल परिसरात पिंजर्यात अडकला. सुमारे चार दिवसांपूर्वी येथे बिबट्या दिसल्याने वन विभागाने त्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावला होता. या पिंजर्यात अखेर बिबट्या आज सकाळी जेरबंद झाला.
दुसरा बिबट्या देवळाली कॅम्प परिसरातील गोडसे मळ्यात जेरबंद झाला. देवळाली कॅम्प येथील नवजीवन सोसायटीजवळ प्रभाकर गोडसे, अशोक गोडसे व दिलीप गोडसे यांचा मळा आहे. या मळे परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्या दिसल्याने तेथेही पिंजरा लावण्यात आला होता.
मळ्यात लावलेल्या पिंजर्यात आज पहाटे हा बिबट्या जेरबंद झाला. बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. नवजीवन सोसायटीजवळ गेल्या तीन-चार महिन्यांत दुसरा बिबट्या जेरबंद झाला आहे.
या परिसरात वारंवार बिबटे येत असल्याने परिसरात पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी प्रभाकर गोडसे, अनुराग गोडसे, अशोक गोडसे, दिलीप गोडसे, दर्शन गोडसे, वैभव गोडसे, सिद्धार्थ पगारे, गौतम गजरे व पवन गजरे यांनी केली. या बिबट्यांना वैद्यकीय तपासणी करून अधिवासात सोडण्यात आले आहे.
Copyright ©2025 Bhramar