Nashik : राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकार्‍याने हॉटेलमालकाकडे मागितली सात लाखांची खंडणी
Nashik : राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकार्‍याने हॉटेलमालकाकडे मागितली सात लाखांची खंडणी
img
दैनिक भ्रमर
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- फॅमिली रेस्टॉरंट व बार सुरळीत चालू ठेवण्यासाठी सात लाख रुपयांची खंडणी हॉटेलमालकाकडे मागणार्‍या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी आशुतोष कृष्णा गडलिंग (रा. गोकुळ बंगला, गोविंदनगर, नाशिक) यांचे रॉयल लिस्टो नावाचे फॅमिली रेस्टॉरंट व बार आहे. या हॉटेल व बारमुळे त्रास होतो, असे म्हणून आरोपी श्रुती यतीन नाईक व यतीन नाईक (दोघेही रा. मोरया बंगला, ज्ञानेश्वरनगर, क्रोमा शोरूमसमोर) यांनी बारमध्ये येणारे ग्राहक व वेटर्सची अडवणूक करून हॉटेल सुरळीत चालू ठेवायचे असेल, तर सात लाख रुपये खंडणीच्या स्वरूपात देण्याची मागणी केली.

लग्न करताना रहा सावध, होऊ शकते 'अशीही' फसवणूक; अविवाहित सांगून केलं लग्न आणि पुढे...

त्यानंतर आम्हाला पैसे दिले नाहीत, तर तुमचे हॉटेल चालू देणार नाही, अशी दमदाटी केली. या प्रकरणी हॉटेलमालक गडलिंग यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार खंडणी मागणार्‍या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

श्रुती यतीन नाईक या एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group