मालेगावमध्ये 10 लाखांच्या बनावट नोटा जप्त
मालेगावमध्ये 10 लाखांच्या बनावट नोटा जप्त
img
चंद्रशेखर गोसावी



नाशिक -  मालेगाव मध्ये दहा लाख रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या असून या प्रकरणात मध्यप्रदेश मधून आलेल्या दोघांना मालेगाव तालुका पोलिसांनी अटक केली आहे.



त्यांना न्यायालयात हजर केले असता आठ दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. 

या सर्व प्रकरणाबाबत माहिती देताना नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, 29 तारखेला रात्री मुंबई आग्रा महामार्गावरील मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या ए वन सागर या हॉटेलच्या परिसरामध्ये दोन नागरिक संशयास्पदरित्या फिरत असताना मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकाला आढळून आले.

त्यानंतर या दोन्ही नागरिकांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या बँकेमध्ये पाचशे रुपयांच्या 2000 नोटा सापडल्या. त्याची किंमत सुमारे दहा लाख रुपये आहे. या नोटांची तपासणी केली असता या नोटा बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर या नागरिकांची अधिक चौकशी केली असता ते मध्य प्रदेश मधील बराणपुर येथील असून वजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी अशी या दोघांची नावे आहेत.

त्यांनी ही बनावट रक्कम नाशिक मालेगाव मध्ये एका व्यक्तीला देण्यासाठी आणली असल्याचे सांगत आहेत. त्याबाबत अधिक तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये नाशिक किंवा मालेगाव मध्ये ही रक्कम कोणाकडे जाणार होती याबाबतचा तपास आता पोलिसांनी सुरू केला असल्याचेही पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group