
नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा हा भारतच नव्हे तर जगभर धार्मिकतेसाठी प्रसिद्ध आहे कारण ही प्रभू रामचंद्र यांची तपोभूमी आहे त्यामुळे नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याला एक आगळे वेगळे धार्मिक महत्त्व आहे.
यंदाही पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ महा कुंभमेळ्याला भूतो न भविष्यती असे करोडोंच्या संख्येने भाविक जगभरातून येणार असून त्या दृष्टीने सरकार आणि प्रशासन अहोरात्र काम करत आहे त्याच अनुषंगाने न्यूज 18 लोकमत या प्रसिद्ध खाजगी वृत्तवाहिनीने नाशिककरांच्या कुंभमेळ्यात प्रशासन आणि सरकार यांच्याकडून असलेल्या अपेक्षा विविध मान्यवरांकडून सिंहस्थ महाकुंभ याविषयी परिसंवाद घेऊन जाणून घेतल्या.
त्यात प्रामुख्याने नाशिक मधील प्रसिद्ध बांधकाम व्यवसाय दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे चेअरमन दीपक चंदे यांनी नाशिक करांच्या वतीने नाशिकला अपेक्षित असलेल्या अशा पायाभूत सुविधा विशेष करून स्वच्छता, रस्ते, आरोग्यसेवा, ट्रॅफिकचे नियोजन हे जागतिक दर्जाचे कसे होऊ शकते याविषयी प्रतिक्रिया दिली.
हा कार्यक्रम आज रविवारी दुपारी 3.21 वाजता न्यूज 18 लोकमत या खाजगी वृत्तवाहिनीवर प्रसारित होणार आहे तरी नाशिककरांनी ही प्रतिक्रिया आवर्जून पहावी असे आवाहन दीपक चंदे यांनी केले आहे