
सातपूरच्या गोळीबार प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेले माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्यासह सहा जणांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
आज प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, संतोष पवार, अमोल पगारे, देवेश शिरताटे आणि शुभम गोसावी यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने 17 ऑक्टोबर पर्यंत वाढीव पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे.
या गुन्ह्यात सह आरोपी असलेला भूषण लोंढे हा अध्यापही फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत