गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या अजय बागुल व पप्पू जाधवला अटक
गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या अजय बागुल व पप्पू जाधवला अटक
img
दैनिक भ्रमर



विसे मळा येथील गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या आरोपी अजय बागुल व पप्पू जाधवला पोलिसांनी काल रात्री उशिरा अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरिसा हे दोघे अद्याप फरार असून, पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

सचिन अरुण साळुंके (वय २८) यांच्यावर २९ सप्टेंबर रोजी पहाटे गोळी झाडून अपहरण करीत त्याला बोरिसा व चोथवे यांनी मारहाण केली होती. या हल्ल्यानंतर साळुंकेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या प्रकरणी मामा राजवाडे आणि अमोल पाटील यांना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यांना १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

इतर बातम्या
नाशिकमध्ये

Nashik :

Join Whatsapp Group