नांदूर नाका येथील राहुल धोत्रे खून प्रकरणातील प्रमुख संशयित माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
राहुल धोत्रेचा खून झाल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यापासून अनेक दिवस उद्धव निमसे हे फरार होते. अखेर काल ते पोलिसांना शरण आले. उद्धव निमसे यांचा वाहनचालक नामदेव मते याने निमसे यांना पळून जाण्यात मदत केल्याच्या कारणावरून त्यालाही अटक करण्यात आली होती.
न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.