
३ ऑक्टोबर २०२५
अंबड लिंक रोड वरील दत्तनगर येथे आज दुपारी एका स्क्रॅपच्या गोडाऊनला भीषण आग लागली होती.
इमरान खान यांच्या मालकीचे हे गोडाऊन आहे. आज दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन दलाचे अंबड विभागाचे आणि सातपूर विभागाचे असे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.
या दोन बंबांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. गोडाऊन जवळ रहिवासी परिसर असल्याने घटनास्थळी पोहोचण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.
आगीचे कारण समजू शकले नाही सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
Copyright ©2025 Bhramar